Sunday, 26 June 2011

मुक्त


पिंजरा तोडून मुक्त झालेला 
तो एक पक्षी जखमी 
पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर
लाल नागमोडी रेषा उमटवित् 
उडतो आहे आपल्या घरटयाकडे 
कदाचित आपल्या मृत्युकडेही 
पण 
त्याच्याकडे करुणेने पाहणारे आपण  सारे 
आणि आकाशही हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला त्याचा तो आनंद .....
त्याचा तो अभिमान ......