Sunday, 13 January 2019


मुसळधार पावसामुळे
चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात
क्षणिक वाटू लागले
की या काळोख्यात
त्या पावसाच्या थेंबांच्या
रुपात जमिनीवर पडू लागले
विजेच्या लख्ख असा
प्रकाश जणू त्या थेंबांची
शोभा वाढवू लागली
नि ढगआपला  गदगडाट आवाज करून
जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या
वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय
सोबतच माती स्वःताचा सुगंध
अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते

Sunday, 21 October 2018

नको आता ती पावसाची सरी वर सर वर भिजवणारी,
आहे ती पुरे आहे सर ऐकांतात साथ देणारी,
नको तो लाजरा चंद्र
आता ती रात्र चांदण्यांची सुखावणारी,
पुरे ती निखळता तिची उमटणारी गालावरची,
नकोत त्या कळ्या नकोत
त्यांचे कोमल गंध,
पुरे ती बट रेंगाळलेली गालावर
मनाला मोहून फक्त अतूट नाते निर्माण करणारी....

Saturday, 22 September 2018

आयुष्याचे धागे...
आज म्हटलं आयुष्य  विणायला घेवूयात,  जमतंय का ते बघुयात 
वाटल अगदी सोपं असेल रंगसंगती जमून आली कि  सुंदर दिसेल 
प्रश्न पडला धागे कोणते कोणते  घ्यायचे?   एक दोनच कि सगळे वापरायचे ?
मग ठरवलं फक्त छान छान धागे घेवू, एक काय, दोन काय सगळेच एकमेकात विणू
सुरवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम 
म्हटलं छान आहे हा धागा, धाग्याने या विन राहील कायम 
मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बऱ्याच भरल्या  जागा, 
थोड थोड  आयुष्य  आकार घेवू लागलेलं पण, अजूनही बरचस विणायच बाकी राहिलेलं, 
एक एक धागा आशेचा, सुखाचा  आणि आनंदाचा घेतला 
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला, हळू हळू विन घट्ट  होत होती. 
तरीदेखील कसलीतरी कमी होती, मग घेतला एक नाजूक प्रेमाचा धागा 
धागा होता सुंदर आणि रेशमी, धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.
एक एक घेतला धागा यशाचा,  किर्तीचा आणि अस्तीत्वाचा  आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश मिळाला, 
सगळेच धागे फार सुंदर आणि प्रसन्न होते, तरीदेखील त्याचातल्या एकसारखे पणाने   मन खिन्न होते. 
थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच, म्हटलं बघुयातरी याचमुळे आपल आयुष्य होतंय का सुरेख 
मग घेतला एक धागा दुखाचा, एक निराशेचा, एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा 
हे चारही धागे विनता एकमेकांमध्ये, आयुष्याला खरा अर्थ लाभला त्याचमुळे 
 दुक्खाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय  आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय  जय नाही 

आणि महत्व पटलं आहे सर्व धाग्याचे  आज मला, सुंदर सुंदर धाग्यानीच फक्त मजा नसते आयुष्याला 

Thursday, 19 July 2018


एकांतात मज
भास तुझा होतो,
भासामध्ये तुझा
सहवास होतो;

हळूवार मग
अंधारतो दिस,
काळोखात तुझा
चेहरा दिसतो;

एकांतात बोलू
लागते शांतता,
शांततेत तुझा
स्वर निनादतो;
अश्रु डोळयांपर्यंत येउन थिजतात आणि पापणीआड दडतात
भावनांची किंमत जेव्हा ना ओठ सांगु शकतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
घाबरुन कासाविस होतो जिव,प्राण जेव्हा कंठात अडकतात
वाळवंटातील मृगजळाप्रमाणे क्षण जेव्हा मला छळतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
एकटया अशा या वाटेवर,क्षितीजापर्यंतच्या शांततेत
आयुष्याच्या समुद्रात लाटा मला जेव्हा भरकटत नेतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
वरदान जेव्हा शाप ठरतात,स्वप्नांना मातीत पुरतात
आधारांचे झरेही मग कधी क्षणात आटतात
हे शब्दच मग मला जगवतात,तॄषार्त मनाला धारांनी भिजवतात
आयुष्याच्या संध्याकाळी नव्या उद्याची आस जागते
        तेव्हा शब्द देतात मला साथ.....

Saturday, 2 March 2013

निशब्द

उनाडलेल्या शब्दांना,
 सारे निशब्द जानवे
वाट शब्दांनीही बघावी
शब्दात निशब्द्लेल्यांची

वादळातील कणांना
वेड उंच उडण्याचे
वाट कणांनीही बघावी
स्वताच्या अधपतनाची

डोंगरातील काजवांना
वेध प्रकाश गीताचे
वाट काजवानीही बघावी
क्षितीजातील किरणांची

उधळलेल्या भावनांना
मार्ग सारे सारखेच
वाट भावनानीही बघावी
मानूस्मृतीत परतण्याची

डोळ्यातील आसवांना
माणूस पोरका जाणावे
वाट आसवानी बघावी
बुढाईच्या जन्मण्याची

Friday, 4 January 2013

मी अव्यक्त आहे, आसक्त नाही.

मी अव्यक्त आहे,
आसक्त नाही.
तुला भेटावेसे वाटते,
पण विचारात कोणतेही,
गैर कृत्य नाही.

अगदी हातात घालून हात,
बोलावेसे वाटते,
तुला सोबत घेऊन,
चालावेसे वाटते,
पण तुझ्या मनात नसतांना,
तुझ्या मनाविरुद्ध वागणारे,
माझे रक्त नाही.

खूप स्वप्न रंगवली आहेत,
जी सांगायाचीयेत  तुला,
खूप इच्छा सजवल्या आहेत,
ज्या मागायच्याहेत तुझ्याकडे,
पण तुझ्या नकार भरल्या नजरेपुढे,
माझी हिम्मत नाही.

तुझा रस्ता माहीत असतांनाही,
मी आडोश्याला उभा राहत नाही.
तू पुढे चालतांना कधी,
तुझ्या मागे चालत नाही.
कारण नसतांनाही कारण काढून,
तुझ्याशी बोलायला येत नाही.
इतरांकडेही तुझा विषय टाळतो,
शक्यतो तुझ्या बाबतीत मौनच पाळतो,
अजिबात अट्टाहास करत नाही,
तुला आठवत ठेवण्याचा,
पण तू दिसलीस कि मनात वादळ उठतं,
चेहऱ्यावर एकही तरंग दिसत नसेल कदाचित,
तरी तुला बघतांना मनी काहूर पेटतं.
पण मी बोलत फक्त नाही.

हल्ली माझ्या अव्यक्तपणालाही भाषा आलिय,
इतरांसाठी तो प्रश्नाचाही विषय झालाय,
आजकाल तुझ्या नकार भरल्या नजरेतही संभ्रम दिसतो,
पण मला बघून तू कधीही रस्ते बदलू नकोस,
आपल्या प्रेमाला त्रास देईन इतका मी उन्मत्त नाही.