Sunday, 13 January 2019

जन्म हा एका टिंबासारखा असतो
गणितात जसा सगळ्याची सुरूवात करतो
तसाच आयुष्यातही करतो
नाती म्हणजे छेदण्या रेशा
तुमच्या भोवती जाळं बुनून राहतात
जपुन हाताळावी लागतात नाही तर,
एका सोबत अनेक तुटतात
प्रेम एका त्रिकोणासारखे असते
बांधिलकी, जवळीक आणि विश्वास
या वर टिकलेले असते
एकही बाजू कमी पडली की नाहिसे होते
मैत्री वर्तुळासारखी असते
जी कुणाशीही, कधीही आणि कशीही सुरू होते
आणि सुरू होऊन फक्त चालतच राहते
तिला अंत नसतो
आयुष्य एका ओळीसारखे असते
जन्माच्या टिंबापासून सुरू होते आणि
नाती, मैत्री आणि प्रेमा भोवती फिरत
कळत नकळत आपल्या अंतापर्यंत घेऊन जाते
असेच असते हे आयुष्याचे गणित जे
प्रत्येकाचे जीवन निर्धारीत करत असते
न्हावुनी जावे मन या चिंब पावसात कधीतरी कोसळेल
हा माझ्या अंतरात वाट पाहतोय ऐसा जणू श्वास दाटलाय
येऊनि बरस तू माझ्या अंगणात
थेंब ओघळावा गाली नकळत
दुःख हि भिजावे तुझ्या अलिंगणात
सांग कधी येतो मिठीत मज घ्याया
सुगंध मातीचा पुन्हा दरवळाया
आतुरलेले मन तहानलेले रान
डोळे लावूनी वाटेवर हे माळरान
कधी सुखाच्या सागरात, तर कधी दु:खाच्या वाळवंटात
कधी यशाच्या शिखरावर, तर कधी अपयशाच्या दरीत
आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगले पत्ते मिळतील की नाही, हे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो
या वर सगळं अवलंबून असतं

जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही
जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा,
हा प्रवास म्हणजे आयुष्य

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले

आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत
जस बघावं तसच दिसत, आपल्याच नजरेतून घडत असत
मनात बऱ्याच इच्छा असतात, काही अधुऱ्या काही पूर्ण होतात
त्यासंगेच आपण जगायचं असत, त्या पूर्ण कराया झगडायच असत
नाही जमलं म्हणून थकायच नसत, पुन्हा नव्याने बहरायच असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत
इथे एखादा प्रश्न असतो, उत्तरे त्याची बरीच असतात
फक्त बरोबर ते निवडायचं असत, त्यातच खर कर्तब असत
वाढलेल्या ताटात तर, एक कुत्रं पण जेवू शकत
आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत
खूप काही करायचं असत, सगळंच मनासारखं होत नसत
पण तो एक पडाव असतो, आयुष्य थोडीच तिकडे संपत
पुढे बराच पल्ला असतो,  आपण चालत रहायचं असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत
घडी घडीने उलगडायच असत, इंचा इंचाने चढायचं असत
सुख दुःखाच हे चक्र असत, निरंतर ते फिरतच असत
अंधाऱ्या त्या रात्रीनंतर, राविकिरणांच स्वागत करायचं असत
कारण आयुष्य हे असच असत, तुझच नाही सगळ्यांचच असत..
जीवनात कधी कधी
               अश्रूंच्या वाहतात  धारा
जीवनात कधी कधी
               हासवांच्या पडतात गारा

जीवनात कधी कधी
              दु:खाचा समोर असतो सागर
जीवनात कधी कधी
              सुखाने भरलेली दिसते घागर

जीवनात कधी कधी
               कष्टाच्या आगीत होरपळावे
जीवनात कधी कधी
               आरामाच्या खुशीत निजावे

जीवनात कधी कधी
                निराशेचा येतो घोर अंधकार
जीवनात कधी कधी
              आशेचा लख्ख प्रकाश असतो फार

जीवन हे सुख-दु:ख, आशा-निराशा
याचाच सारा खेळ आहे
जीवन म्हणजे अजून काय असणार
जीवन म्हणजे सुख दु:खाचा मेळ आहे.
शब्द•••♡•••


शब्दच असतात ते       1
 कधी हसवतात तर
  कधी रडवतात अन
    या जगात स्वताच
      अस्तित्व टिकवतात
        शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                 2
जगण्यास आशेची,
  उमीद दाखवतात
  अन प्रत्येक वळनावर
   खूप आदर्श घडवतात
     शब्दच असतात ते

शब्दच असतात ते             3
समाजाच्या अबोल समस्या
 काव्यातून उमटवतात अन
  लोकांच्या मनावर स्पूर्तिने बिंबवतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                    4
कधी त्याच्याकडून तर
 कधी तिच्याकडून ते प्रेमाचे
  तिन अनमोल शब्द म्हणवतात
   शब्दच असतात ते

शब्दच असतात ते              5
कधी आपल्यास परक तर
 कधी परक्यास जवलतात अन
  स्पर्देच्या युगात स्व:ताची  
   स्व:ताशी शर्यत जुपंतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                 6
कधी ग्रंथातुन तर
 कधी काव्यातून आपणास
  नव चैतन्याची शिकवण देतात
   अन उत्तम श्रवणाने आपल्
    अस्तित्व टिकविन्यास मदत करतात
     शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                    7
कधीही पूर्णविराम नसनारे
 या जगात स्व:ताच अखंड
  स्वतंत्र गाजविनारे
   शब्दच असतात ते

शब्दच असतात ते                8
कधी वचने तर
 कधी आव्हाने देतात
  अन स्वतःची फसवणूक करुण
   शब्दास खोट ठरवतात
    शब्दच असतात ते

शब्दच असतात ते            9
कधी प्रारंभ तर कधी
 समारोह करतात अन
  संस्कृती च्या रीतीने
   आभार प्रदर्शन घडवतात

मुसळधार पावसामुळे
चांदण्या हळूच ढगांआड़ गेल्यात
क्षणिक वाटू लागले
की या काळोख्यात
त्या पावसाच्या थेंबांच्या
रुपात जमिनीवर पडू लागले
विजेच्या लख्ख असा
प्रकाश जणू त्या थेंबांची
शोभा वाढवू लागली
नि ढगआपला  गदगडाट आवाज करून
जणू वाटे आपल्या हातांनी  टाळ्या
वाजवून त्यांचे स्वागत करू पाहतेय
सोबतच माती स्वःताचा सुगंध
अख्ख्या  निसर्गाचा कायापलट करते