Sunday, 13 January 2019


विधीलिखीत काय आहे,माहीत ना कुणाला...
रंगणार स्वप्न केव्हा,माहित ना कुणाला...
जिवनाचे काय कोडे,उलगडे ना कुणाला...
वायुची काय रचना,दिसली ना कुणाला...
प्रेमाची काय भाषा,कळली ना कुणाला...
आसमंताची काय सिमा,मोजता ना येई कुणाला...
मरणाची काय भिती,जगणे ना कुणाला...
जिवन गणित अकलनिय,कळले ना कुणाला...
अकलनिय सारे आहे,कळणार ना कुणाला...
विधीलिखीत काय आहे,माहीत ना कुणाला…
दिवस गेला सरून , रात्र आली तशी
एकक्षण सुखासाठी , जीव हा उपाशी
आशा ठरली फोल , काही मनाचे न झाले
स्वप्नांचे ते घोडे , नशिबात हरून गेले
दुःखामध्ये हास्याचं , एकमेव कारण मात्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र
दुःखाच्या अंधारात , सुखाचा दिवा
चांदण्यांच्या सोबतीला , चंद्रही हवा
थकून भागून जीव , घेई मग विसावा
एकक्षण त्यालाही , आराम असावा
सारंकाही बोलकं , तरीही मुकीच सारी पात्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र
सूर्यनारायनही , गेला निघून दूर
पाखरे झोपी गेली , हरवले ते सूर
सारं सुने सुने , अन मोकळे किनारे
शब्दाविन गुणगुणनारे , अबोल ते वारे
स्वप्नासाठी झुरणारं , स्वप्नाचं सत्र
गोजिरवाण्या स्वप्नांसाठी , आतुरलेली रात्र
भाव+अर्थ
शब्द भाव अर्थ कवितेचा
मध्यांतरी, कधी तळाला,
शब्दांच्याच विरामातल्या
शांततेत तो सामावलेला...
शब्दांच्याच कृतीतल्या
आकृतीचा भास मनाला,
परीस्थिती, वय, वृत्ती
सापेक्ष भावनेत गोवलेला...
अर्थ गुढातल्या उत्कटतेचा
नभ आकृती भासातला,
कृष्णविवरातल्या पोकळीचा
कि कोहंमच्या आर्ततेतला..?
नाते शब्दांशी
दुःख ऐकायला नसते कोणी
तेव्हा वाढतो मनावरचा भार
कागदांवर उतरता शब्द हळूच
तेव्हा होते मन हलके फार
मी फारच नशीबवान आहे
नाते जोडले माझ्याशी शब्दांनी
कितीही असले दुःख जरी
गिळून घेतले अश्रू पापण्यांनी
शब्द खिळवून ठेवतात मला
लागताच कधी चाहूल दुःखाची
शपथ आहे शब्दा तुला
नको सोडू साथ कवितेची
भावना उतरते कवितेच्या रूपात
वाट मिळते नवीन वळणाची
अशा जगात वावरतो जिथे
माणसं आहेत दगड मनाची
जन्म हा एका टिंबासारखा असतो
गणितात जसा सगळ्याची सुरूवात करतो
तसाच आयुष्यातही करतो
नाती म्हणजे छेदण्या रेशा
तुमच्या भोवती जाळं बुनून राहतात
जपुन हाताळावी लागतात नाही तर,
एका सोबत अनेक तुटतात
प्रेम एका त्रिकोणासारखे असते
बांधिलकी, जवळीक आणि विश्वास
या वर टिकलेले असते
एकही बाजू कमी पडली की नाहिसे होते
मैत्री वर्तुळासारखी असते
जी कुणाशीही, कधीही आणि कशीही सुरू होते
आणि सुरू होऊन फक्त चालतच राहते
तिला अंत नसतो
आयुष्य एका ओळीसारखे असते
जन्माच्या टिंबापासून सुरू होते आणि
नाती, मैत्री आणि प्रेमा भोवती फिरत
कळत नकळत आपल्या अंतापर्यंत घेऊन जाते
असेच असते हे आयुष्याचे गणित जे
प्रत्येकाचे जीवन निर्धारीत करत असते
न्हावुनी जावे मन या चिंब पावसात कधीतरी कोसळेल
हा माझ्या अंतरात वाट पाहतोय ऐसा जणू श्वास दाटलाय
येऊनि बरस तू माझ्या अंगणात
थेंब ओघळावा गाली नकळत
दुःख हि भिजावे तुझ्या अलिंगणात
सांग कधी येतो मिठीत मज घ्याया
सुगंध मातीचा पुन्हा दरवळाया
आतुरलेले मन तहानलेले रान
डोळे लावूनी वाटेवर हे माळरान
कधी सुखाच्या सागरात, तर कधी दु:खाच्या वाळवंटात
कधी यशाच्या शिखरावर, तर कधी अपयशाच्या दरीत
आयुष्य एका झोक्यासारखे झुलत राहते

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ
चांगले पत्ते मिळतील की नाही, हे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पत्त्यांवर आपण कसा डाव मांडतो
या वर सगळं अवलंबून असतं

जगात येताना आपल्याकडे देह असतो नाव नाही
जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही
मिळालेल्या देहाचे नावात रुपांतर करण्याचा,
हा प्रवास म्हणजे आयुष्य

नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात कधी काय होईल, काही सांगता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले