Tuesday, 30 April 2019


नाती

नाती म्हणजे मातीतला ओलावा ,
नाती म्हणजे उन्हाळ्यातील गारवा,
नाती म्हणजे आयुष्याचा आधार ,
नाती म्हणजे जी फुलवतात संसार,

काही नाती असावीत आंबट,
काही नात्यात गोडवा हवाच,
नात्यानात्यात असते थोडेफार अंतर,
पण सरतेशेवटी नातेसंबध हवाच,

माणूस म्हटला कि नाती आलीच,
दुरावा आला तरी सारी आपलीच ,
आयुश्याभर तिजोरी बरी असली तरी चालते,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
माणसांच्या गर्दीवरून जीवांची पुंजी समझुन येते

Friday, 25 January 2019

अलीकडे --पलीकडे 

अलीकडे धरती  पलीकडे आकाश 
मध्ये क्षितिजाचा  नुसताच आभास . 

अलीकडे ऐलतीर  पलीकडे पैलतीर 
मध्ये सरितेची जीवनगाथा .

अलीकडे भूत  पलीकडे भविष्य 
मध्य वर्तमानातले कडू - गोड क्षण. 

अलीकडे जन्म पलीकडे मरण 
मध्ये जीवनाचे सप्तरंगी अंगण 

Wednesday, 23 January 2019

रंगात रंग मिसळले असे ,
शोध नव्या रंगाचा लागताना।
फिके वाटती तरी सारे, 
हे रंग कुणी नसताना ॥

सोबत जणांची, साज नात्याची,
या सार्या रंगांतूनी जपताना।
मनी आले आनंद भरून,
पुन्हा छवी हास्याच्या छापताना॥

रंगात क्षण काही असावे,
अचानकच आठवण करून देताना।
त्या क्षणांची गाठ बांधूनी,
नयनी अश्रू नवे दाटताना॥ 

कधी दाट, कधी फिकट,
असावे रंग आयुष्य रेखाटताना।
नक्कीच व्हावे रंगीत कधीतरी,
मनी आशा हीच बाळगताना॥

विचारही न आला लिहीता,
हे काव्य रंगास संबोधताना।
उपमेची ही दुनिया सारी,
मी रंग नात्यांत जडताना॥

Tuesday, 15 January 2019

अस्तित्व
सागराच्या लाटांमध्ये सोसाट्याच्या वादळांमध्ये
चंद्राच्या चांदणीमध्ये सूर्याच्या किरणांमध्ये
गगनचुंबी पहाडांमध्ये दूर वाहत्या नद्यांमध्ये
श्वेत अश्वेत मेघांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये

पहाटेच्या दवबिंदुंमध्ये रात्रीच्या काळोखामध्ये
रंगबिरंगी फुलांमध्ये  कस्तुरीच्या सुगंधामध्ये
हिवाळ्यातील धुक्यामध्ये पावसाच्या सरींमध्ये
संधीकालच्या आकाशामध्ये ग्रहणातील कड्यामध्ये

पृथ्वीच्या गुरुत्वामध्ये ज्वालामुखीच्या लावामध्ये
अगडबंब त्सुनामिमध्ये धरणीच्या कम्पांमध्ये
गडगडणाऱ्या मेघांमध्ये कडकडणाऱ्या विजांमध्ये
देवाचे अस्तित्व जाणवी निसर्गाविष्कारांमध्ये

Sunday, 13 January 2019

मन कधीच फ़सत नाही..
सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात अनोळखीही असतात काही
डोळे जरी फ़सले तरी मन कधीच फ़सत नाही..
आपणच पटववून देत असतो अनोळखीतील ओळख मनाला,
दिवस उलटले की आपण, पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला..
अगदी जवळचे चेहरेही कधी कधी ओळख हरवून बसतात,
काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही खुप ओळखीच्या वाटतात..
धडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो असा स्वत:चा चेहरा,
पण त्यातील प्रत्येक ठोका असतोच ना आपला?
कागदावरचे शब्दही हा नियम मोडत नाहीत,
कधी मी त्यांना तर कधी ते मला ओळखत नाहीत
सुगंध मनातला मनातील अंतरातला
अंतरातील भावनेतला सुगंध कुसुमातला
कुसुमातिल गाभ्यातला गाभ्यातिल मधातला
सुगंध मातीतला मातीमधल्या ओलाव्यातला
ओलाव्यातिल धुन्दितला सुगंध आसमंतातला
आसमंतातिल मेघातला
मेघामधुन बरस्नार्या धारान्तला
सुगंध पाव्यातला पाव्यातिल सुरातला
सुरामधिल मधुर गाण्यातला सुगंध प्रीतितला
प्रीतिमधल्या प्रेमातला प्रेमामधिल अमरत्वातला
सुगंध तुझ्या नी माझ्या मैत्रितला मैत्री  मधल्या रेशीम धाग्यातला
आणि त्या धाग्यामधील विश्वासातला
नाती म्हणजे मातीतला ओलावा ,
नाती म्हणजे उन्हाळ्यातील गारवा,
नाती म्हणजे आयुष्याचा आधार ,
नाती म्हणजे जी फुलवतात संसार,

काही नाती असावीत आंबट,
काही नात्यात गोडवा हवाच,
नात्यानात्यात असते थोडेफार अंतर,
पण सरतेशेवटी नातेसंबध हवाच,

माणूस म्हटला कि नाती आलीच,
दुरावा आला तरी सारी आपलीच ,
आयुश्याभर तिजोरी बरी असली तरी चालते,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी,
माणसांच्या गर्दीवरून जीवांची पुंजी समझुन येते