Monday, 21 February 2011

अशी मैत्रीच ठेवा

मैत्री एक झरा खळाळत वाहणारा
दगड धोंड्यातून बेभान फेसाळून
सर्वाना चिंब भिजवणारा
आणि शोध घेणाऱ्या मित्रांची
भेटल्यावर तहान भागवणारा

असाच हा झरा गेट together  असल्यावर
आनंदाने बेभान होऊन कोसळणारा
आणि उन्हायात मात्र एकट असताना
थेंब थेंब पडत राहून थोडा थोडा जमा होणारा
पण नेहमी अखंड वाहणारा साथ देणारा

असाच मैत्रीचा झरा आपल्यात ठेवा
आणि हवा तसा वापरा ... ....
दुसऱ्याला आनंदाने नाहून चिंब
किवा कठीण प्रसंगात जवळ ठेवून
अडचणीचे तहान भागवा.....

1 comment: