वहीच्या पानांत लिहिलय माझ मन...
काही पाने भरलित...तर काही तशीच कोरी अजून ...भरलेली तरी कुठे सांगतायत खरी गोष्ट ठासून..
बरीचशी पुसट...तर काहीच आहेत ठळक अजून...
स्वप्नं पाहिलीत बरीचशी लिहून...काही उतरली सत्यात...काही अजूनही अर्धसत्यात..तर बरीचशी दिलीत फाडून...फाटलेली पान जरी ती ...तरी पीच्छा कुठे देतात सुटून...
लक्षात ठेवा..फाटलेल्या पानांचा उभा कोपरा कायम असतो तिथेच चिटकून...
अनुभवलंय बराच काही लिहिता लिहिता...अर्ध मदमस्त आनंदयात्रीसारखा...तर उरलेलं उनाड पक्ष्यासारख...आता जरा थोडा काही फक्त स्वतासाठी लिहायचंय..आयुष्यात परत एकदा प्रेमाच्या अडीच अक्षरांना गिरवायचय.. !!
नवीन कोऱ्या पानांचा वास आता उत्साहित करतोय..आधी लिहिलेल्या पानांना खुलं आव्हान देतोय...आता जपूनच लिहायचं जरा..नको ती खाडाखोड पुन्हा...म्हणतात ना..सुंदर नि सुवाच्य अक्षर हाच खरा दागिना..!!!

No comments:
Post a Comment