Thursday, 24 February 2011

आता मी काही बोलतच नाही

मित्रांची नावे E -Mail  ID  असतात
भेटायच्या जागा chat रूम  असतात
कट्यावर आता कोणी भेटतच नाही
दिलखुलास दिलेली शिवी कानी पडतच नाही

म्हणून हल्ली मी काही बोलतच नाही

दिसलं कि हाय जाताना bye 
पण समोर असताना प्रश्नचिन्ह आता बोलायचे काय
अशी खोटी जवळीक मी साधतच नाही
मुखवट्या आड चेहरा कधी लपवतच नाही

म्हुणन हल्ली मी ........

आज इथे उद्या तिथे .....
कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टाहास नाही
पण इथून तिथे जाताना कोणी निरोप देईल कि नाही
जाताना आपण कोणी एक अश्रुतरी ढाळेल कि नाही

म्हुणन हल्ली मी .......
शब्दच हल्ली अर्थ विसरतात
संवेदनाच हल्ली बधीर होतात
भावना हि बोथट होतात
अगदी थोडी माणसे हि कविता शेवट पर्यंत वाचतात
म्हुणन .......  म्हणून हल्ली मी काही बोलतच नाही

1 comment: