अडगळीच्या खोलीमधले दप्तर
आजही जेव्हा दिसत
मन पुन्हा तरुण होऊन
बाकांवरती जाऊन बसत ||
प्राथनेचा शब्द न शब्द माझ्या
कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली वही माझी
अपूर्णच शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरच
बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारख
स्वतालाच रागवून बघतो ||
इवल्याश्या रोपट्याची तुम्ही
इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||
चांगले अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोट संस्कारांचा
समास तेवढा सोडतो
फळ्यावरच्या सुविचारांसारखी
रोज माणसं जोडतो ||
योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पाने
ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही
फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||
आजही जेव्हा दिसत
मन पुन्हा तरुण होऊन
बाकांवरती जाऊन बसत ||
प्राथनेचा शब्द न शब्द माझ्या
कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली वही माझी
अपूर्णच शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरच
बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारख
स्वतालाच रागवून बघतो ||
इवल्याश्या रोपट्याची तुम्ही
इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||
चांगले अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोट संस्कारांचा
समास तेवढा सोडतो
फळ्यावरच्या सुविचारांसारखी
रोज माणसं जोडतो ||
योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पाने
ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही
फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||
No comments:
Post a Comment