Wednesday, 16 March 2011

पायात माझ्या त्राण नव्हते!!!


मायभूमीच्या संरक्षणार्थ हात दोन सरसावले होते
पण घराचा उंबरा ओलांडताना
पायात माझ्या त्राण नव्हते
शत्रूंच्या छातीचा वेध घेणारे
वज्र बंदुकीतून निघत होते
मित्राचं वाहणारे रक्त बघताना
पायात माझ्या त्राण नव्हते
स्वकीयांच्या आरोळ्यांनी कान तेव्हा
थिजले होते थरथरणारे काळीज सांभाळताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जवानांच्या रक्ताचे पाट येथे वाहत होते
प्रतिशोधाची भावना मनी असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जग हे सोडताना अश्रू डोळ्यातून वाहत होते
निघण्याची वेळ आलेली असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
मायभूमीला सोडताना काळीज सुन्न 
झाले होते अखेरचे श्वास घेताना
पायात माझ्या  त्राण नव्हते
शेवटचे वंदन स्वीकार माते कर्तव्य
मी वाटते निभावले आहे 
मातीत मला मिसळताना 
पायात माझ्या  त्राण नव्हते


No comments:

Post a Comment