टेकर्स हे नाव काढले कि डोळ्यासमोर उभी राहते ती एक आकृती
पाठीवर जाडजूड वाकडी तिकडी हॅवर सॅक
चित्रविचित्र T -Shirts आणि ३/४ pants आणि सॉकस सकट दिसणारे बूट
असा विचित्रच पेहराव असतो या माणसांचा पण
जिथे साधा सामान्य माणूस जाण्याचा विचार करत नाही
तिथे हे टेकर्स वाले Arrange केल्यावर निघतात एका वेगळ्याच आवेशात
पण हे सर्व कस Arrange करतात कुणास ठाऊक
एकाच कंपनी मधील ४ ते ५ जणांना रजा कशी Arrange होते
आदल्या दिवशी ठरलेला बेत सर्व काही होऊन success होतोच कसा????
आणि याचे देखील समजत नाही.......
एरवी Reservation करून जागा घेणारी हि लोकं ट्रेकिंग ला निघाल्यावर
थोड्याश्या जागेत जनरल बोगीत adjust कशी होतात
एशियाड किंवा वोल्वो मधून प्रवास करणाऱ्यांना लाल एस टी कशी चालते
न समजणारे एक कोडे आहे.....
घरात असताना स्वताला वेगळी झोपण्याची व्यवस्था पण ट्रेकिंग मध्ये
दुसर्याच्या उरावर पाय ठेवून झोपण्याची तयारी
पोटात भूक लागली कि आई आणि बायकोच्या नावाने शंख करणारे आपण
पण रोजच्या पेक्षा उशीर झाला आणि तरीही कच्चे खायला लागले तरी
त्यावर ताव मारणारे टेकर्स हे आपणच कि ... काहीही समजत नाही.....
रोज स्वतःच्या शहरात फिरताना एका चौकातून दुसऱ्या चौकात
जायला रिक्षा लागते पण १५ ते २० कि. मी. चे हे ट्रेकर्स असताना कस सहज
पार करतात तेही पाठीवर ओझे असताना ..... खरच काही समजत नाही......
पण हे जिथे जातात तिथे एक प्रकारचा स्वाभिमान जागृत करतात
असणाऱ्या परीस्थितीशी जुळवून घेतात आणि निसर्गाची देखभाल करतात ....
आपल्या इतिहासाचे भान आणि शान राखण्याची जबाबदारी आपलीच आहे हे
ओळखून असतात ..... हेच ते खरे ट्रेकर्स ...................................
जे मनात इच्छा धरतात ति तडीस नेतात आणि एका चांगल्या
उदिष्टासाहीतच ती पूर्ण करतात ....... शेवटी
ट्रेकर्सच ते एका सळसळत्या उत्साहाचे
जणू प्रतीकच ते !!!!!!!

Mast!!!! '
ReplyDeleteChinmay:)
mast...!!!!
ReplyDeleteawad nasel tyalahi trek la yawas watel....