Friday, 18 March 2011

College Life

कॉलेजलाइफ माझे कॅन्टीन मधला चहा 
चहा सोबत वडापाव पैसे कुठले खिशात 
उधारीचे खाते राव

कट्ट्यावर बसण लेक्चर चुकवून 
पोरींची चेष्टा करण 
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच झुरनं

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला 
कुणाच्या तरी वहीतले पान
आणि पेन सुद्धा ढापलेला

परीक्षा जवळ आली कि 
मात्र रात्री जागायच्या 
डोळ्यात स्वप्न उद्याची म्हणून 
झोपाही शहाण्यासारखे वागायच्या

पूर्ण व्हायचे एक वर्तुळ 
एक वर्ष सरायचे पुन्हा 
नव्या पाखरांसोबत
जून झाड भरायचं

अशी वर्तुळे भरता भरता 
कळला कागदच भरला 
वर्तुळ झालेल्या कागदाला 
सलाम करायचा उरला

पुन्हा नवीन रस्ता
नवीन साथीदार त्याच
जुन्या रस्त्याच्या प्रवासाचे !!!

No comments:

Post a Comment