Thursday 24 February 2011

आता मी काही बोलतच नाही

मित्रांची नावे E -Mail  ID  असतात
भेटायच्या जागा chat रूम  असतात
कट्यावर आता कोणी भेटतच नाही
दिलखुलास दिलेली शिवी कानी पडतच नाही

म्हणून हल्ली मी काही बोलतच नाही

दिसलं कि हाय जाताना bye 
पण समोर असताना प्रश्नचिन्ह आता बोलायचे काय
अशी खोटी जवळीक मी साधतच नाही
मुखवट्या आड चेहरा कधी लपवतच नाही

म्हुणन हल्ली मी ........

आज इथे उद्या तिथे .....
कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टाहास नाही
पण इथून तिथे जाताना कोणी निरोप देईल कि नाही
जाताना आपण कोणी एक अश्रुतरी ढाळेल कि नाही

म्हुणन हल्ली मी .......
शब्दच हल्ली अर्थ विसरतात
संवेदनाच हल्ली बधीर होतात
भावना हि बोथट होतात
अगदी थोडी माणसे हि कविता शेवट पर्यंत वाचतात
म्हुणन .......  म्हणून हल्ली मी काही बोलतच नाही

आठवण आली


आठवण आली माझी कधी तर पापण्या जरा मिटून बघं,
सरलेल्या क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ,
आठवण आली माझी कधी तर
त्या वळणा-या पाऊल वाटेवरती उमटलेली आपली पाऊले बघ,
आठवण आली माझी कधी तर उडणा-या पक्षांकडे बघ,
त्यांच्यासारखच माझं मन तुझ्याकडे आलेल बघ,
आठवण आली माझी कधी तर चांदण्या जरा मोजून बघ,...

Tuesday 22 February 2011

शब्द

जुन्या आठवणी प्रत्येक रात्री हरवून जातात
हृदयातील वेदना डोळ्यातून वाहून जातात
कधीतरी मनाचे दरवाजे उघडे ठेवून
ऐका जरा
शब्दच हे मूक होऊन खूप काही बोलून जातात

Monday 21 February 2011

अशी मैत्रीच ठेवा

मैत्री एक झरा खळाळत वाहणारा
दगड धोंड्यातून बेभान फेसाळून
सर्वाना चिंब भिजवणारा
आणि शोध घेणाऱ्या मित्रांची
भेटल्यावर तहान भागवणारा

असाच हा झरा गेट together  असल्यावर
आनंदाने बेभान होऊन कोसळणारा
आणि उन्हायात मात्र एकट असताना
थेंब थेंब पडत राहून थोडा थोडा जमा होणारा
पण नेहमी अखंड वाहणारा साथ देणारा

असाच मैत्रीचा झरा आपल्यात ठेवा
आणि हवा तसा वापरा ... ....
दुसऱ्याला आनंदाने नाहून चिंब
किवा कठीण प्रसंगात जवळ ठेवून
अडचणीचे तहान भागवा.....

Saturday 19 February 2011

गरज

हिरवळीवर या पावसाचे थेंब जणू  मोतीच दिसत होते
ती मात्र जीवनात असताना ते मोती मात्र तिच्या गळ्यातच होते
एका जोरात वादळाने असा काही तडाका दिला
त्यामुळे ते मोती जणू फरकटले आणि
ती सुद्धा त्यात विरून गेली
अजूनही मोती आणि ती मला मात्र शोधताहेत
पुन्हा एकत्र यायला माझा हातभार लागेल अशी मनात
एक इच्छा धरूनच ......
स्वतःच्या मनात ...... बोलण्याची गरज असतानाही......


                                               सुबोध