Thursday 19 July 2018


एकांतात मज
भास तुझा होतो,
भासामध्ये तुझा
सहवास होतो;

हळूवार मग
अंधारतो दिस,
काळोखात तुझा
चेहरा दिसतो;

एकांतात बोलू
लागते शांतता,
शांततेत तुझा
स्वर निनादतो;
अश्रु डोळयांपर्यंत येउन थिजतात आणि पापणीआड दडतात
भावनांची किंमत जेव्हा ना ओठ सांगु शकतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
घाबरुन कासाविस होतो जिव,प्राण जेव्हा कंठात अडकतात
वाळवंटातील मृगजळाप्रमाणे क्षण जेव्हा मला छळतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
एकटया अशा या वाटेवर,क्षितीजापर्यंतच्या शांततेत
आयुष्याच्या समुद्रात लाटा मला जेव्हा भरकटत नेतात
       तेव्हा शब्द देतात मला साथ
वरदान जेव्हा शाप ठरतात,स्वप्नांना मातीत पुरतात
आधारांचे झरेही मग कधी क्षणात आटतात
हे शब्दच मग मला जगवतात,तॄषार्त मनाला धारांनी भिजवतात
आयुष्याच्या संध्याकाळी नव्या उद्याची आस जागते
        तेव्हा शब्द देतात मला साथ.....