Wednesday 5 December 2012

अजुनही मला आठवतंय….

Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो,
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो...

Canteen वाल्याला शिव्या
घालत बाहेरच्या café मध्ये जायचो,
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो... ;D

Library card चा तसा
कधी उपयोग झालाच नाही,
Canteen समोरच
असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत...

चालु तासाला मागच्या
बाकावर Assignment copy करायचो,
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो, ;)
खुप आठवतात ते दिवस…!!

सोबत रडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते,
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणि येतं... :'(

Friday 2 November 2012


ek vaoDI maOHaINa haotI maaJaI…
ek vaoDI maOHaINa haotI maaJaI
baaolaayalaa laagalaI kI AaplasaM k$na TakNaar
itcaM mana mhNajao inatL paNyaacaa Jara¸
svat:caa Asaa rMgaca naahI %yaalaa

jaao rMga imasaLlaa %yaaca rMgaat nha}na inaGaNaar
nakLtpNao %yaacyaaSaI ek$p hao}na jaaNaar
itlaa ek idvasa ivacaarlaM
yaatlao caaMgalao imaHa ksao ga AaoLKtosa tU

tI mhNaalaI¸
"jao rMga p`vaahabaraobar vaahUna jaatat¸
to maaJyaapasauna vaogaLo haotat
Kro imaHa tr to Aahot¸ jao maaJyaaca saarKo Asatat¸
maaJyaat evaZM imasaLtat kI
jyaaMnaa maaJyaahUna vaogaLM kQaI saaMgataca yaot naahI
jasaa paNyaacyaa daona qaoMbaatlaa frkca kQaI
krta yaot naahI…………"

Wednesday 17 October 2012

बहुतेक असावे हे प्रेम ......

एक दुपार अशीच सरत्या मे महिन्याची
मी खिडकी पाशी वाचत बसलेलो
इतक्यात चाहूल लागली पावसाची
हवेत आलेल्या गारव्याने उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्णमेघांनी चांगलीच जिरवली
सोसाट्याचा वर सुटला आणि
बटांशी तिच्या खेळू लागला
त्या हळुवार स्पर्शात
माझा भास तिला झाला
बघता बघता जलधारा
बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी धरती भिजवू लागल्या
झाड पान रस्त्यासोबत
हवेलाही नाही सोडले
ऊरात दडलेल्या आठवणीना
हलक्या सरींनी जागवले
नकळत हातातले पुस्तक मिटल
मन भूतकाळात रमलं
ओल्या मृदुगंधासोबत
आठवणीच अत्तर दरवळल
पहिल्या पावसाचे हेच तर
अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच खूप जवळच नात असत.....
                                      चिन्मय .................

Thursday 11 October 2012

आठवणी...


काळोखात मिट्ट गुडूप झालेल्या,
आपल्या सावल्या...
जेव्हा आपल्याच अंगावर येऊ पाहतात,
आठवणींच्या वाटेवरुन..
आपल्या तना-मनात शिरतात,
काहीच सुचत नाही..
पण एवढं नक्की,
आठवणींच्या वाटा..
नेहमी काळजातूनच पुढे जातात..
रक्ताचे पाट वाहत राहतात..
हुंदक्यांचे घाटांवर घाट चढत राहतात,
तळवे ओलसर होत राहतात..
झंझावताच्या लाटांच्या लाटा,
खेचत राहतात्..आतपर्यंत्..खोल खोल..
आणि पालापाचोळ्यासारखं भिरकावून देतात..
उष्ण उष्ण श्वास काळजात भरुन राहतात,
पळसाची फुले फुलत राहतात...
धुवांधार पावसात,
कोसळणार्‍या ,कडाडणार्‍या विजा ..
मन पित राहत,
त्या पिण्याला विरोध करण्याच बळ..
ते मात्र त्याच्यात नसतं,
म्हणूनच..
आठवणींच्या देशात जाऊच नये कधी,
तुटलेले धागे सांधूच नये कधी..
जखम भरलेली असते..
पुन्हा ती उघडी करुच नये कधी.. ...

Wednesday 15 August 2012

पाऊस


पहिल्या पावसात बाळाचं अल्लडपणानं भिजणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

तरीपण बाळाचं आपल्या चिमुकल्या ओंजळीत पावसाचं पाणि साठवणं
साठवलेलं पाणी आईच्या अंगावर उडवण,
आईनं रागानं वटारलेले डोळे बघुन न बघितल्या सारखं करणं
पुन्हा दंग होऊन चिमुकल्या पावलांनी पावसात थिरकणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

पावसातच बसुन कागदि होडया वाहत्या पाण्यात सोडणं,
छत्री उलटी धरुन पडणाऱ्या गारा त्यात वेचण,
एका हातात गारा आणि एका हातात होडी धरून, एका डॊळ्यानं बाळाचं आईकडं बघणं
आईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणं
आता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणं

पावसाचं थांबणं,
चिंब भिजून बाळाचं घरात येणं,
खोट्या रागानंच आईन एक धपाटा घालणं,
बाळाचं नाराज होणं आणि
पाचच मिनीटात आईला जाउन बिलगणं,
लाडानच "आई भुक लागलीये" म्हणणं

गरम दुधाच्या पेल्यात
बिस्किट बुडवुन खाताना टेबलावर
इवलुशी मांडी घालुन बसलेल्या बाळाचं गोंडस दिसणं,
छोटसं नाक उडवत, तोंडात बिस्कीट ठेऊन
बाळाचं आईकडं बघून हसणं

असच चाललं अनेक वर्ष...

खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदलत गेलं...

हेच बाळ आता मोठं झालय...
खूप शिकून परदेशात गेलय....
आई मात्र तिथच राहिलीये...

इतके दिवस बाळात रमणारी आई ,
आता दासबोध, ज्ञानेश्वरीत जीव रमवतीये,
पहिला पाऊस येताच, त्याच खिडकीत येऊन
पावसात नाचणाऱ्या बाळाला शोधतीये...
पण
बाळ आता मोठं झालय...
खूप शिकून परदेशात गेलय....
खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...
परदेशातच सेटल होण्याच्या गोष्टी करु लागलय,
भुताच्या गोष्टी ऎकत, घरभर नाचत खाल्लेल्या
आईच्या हातच्या वरण-भाताचा घास त्याला डाचू लागलाय,
परदेशातला पिझ्झा-बर्गरच त्याला जास्त आवडू लागलाय

पावसात अल्लडपणानं नाचणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
दप्तर पाठीला अडकवुन शाळेला जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
ट्रॉली बॅग ओढत एअरपोर्टवरून परदेशात जाणारं बाळ आईन कौतुकानं बघीतलं
खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...
पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...

आश्वस्त खूण

मावळतीचा हा संधिप्रकाश
 गलबलवून टाकतो
खूप वर्षानंतर नदीकिनारी
 बाभळीखाली भेटावा बालमित्र;
नि त्याच्या डोळ्यात ओथंबून यावं
काळाच्या ओघात हरवलेलं बालपण---
उघडावी मूठ सापडावे शिंपले
काठाशी वाळून खरवडलेले शेवाळपोपडे
तरीही तुझ्या नितळ स्पर्शातून
 झुळझुळती प्रवाहाचे बुडबुडे --
सूर्य बुडत  असतो यातनांचे डोह घेऊन ;
काहुरलेल सैरभैर मन
 हळूहळू होतं चांदणप्रकाशाच्या आधी...