Monday 28 March 2011

शेवटी एक मुलगी


मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो?
त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…

तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात, तारीफ केली नाही,
तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.


तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत.
होकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.

तुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते किती बोअर असतं.तिला वारंवार भेटला नाहीत,
तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय?

तुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात
तुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर तुम्ही किती गबाळे आहात हो?

तुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे!
तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं तिच्यावर प्रेमच नाही
तुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही
तुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही

तुम्ही तिला वारंवार किस केलं नाही, तर तुम्ही किती थंड आहात
तुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.

तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं?
तिला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर!!!

तुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता
ती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं…

रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत
तुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.

तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.

तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं
तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.

यांना समजून घेणं कठीण असलं, तरी हव्याहव्याशा अशा याच मुली

Friday 18 March 2011

टेकर्स


टेकर्स हे नाव काढले कि डोळ्यासमोर उभी राहते ती एक आकृती
पाठीवर जाडजूड वाकडी तिकडी हॅवर सॅक 
चित्रविचित्र  T -Shirts  आणि ३/४ pants आणि सॉकस सकट दिसणारे बूट
असा विचित्रच पेहराव असतो या माणसांचा पण 
जिथे साधा सामान्य माणूस जाण्याचा विचार करत नाही 
तिथे हे टेकर्स वाले Arrange केल्यावर निघतात एका वेगळ्याच आवेशात

पण हे सर्व कस Arrange करतात कुणास ठाऊक 
एकाच कंपनी मधील ४ ते ५ जणांना रजा कशी Arrange होते 
आदल्या दिवशी ठरलेला बेत सर्व काही होऊन success  होतोच कसा????
आणि याचे देखील समजत नाही.......
एरवी Reservation  करून जागा घेणारी हि लोकं ट्रेकिंग ला निघाल्यावर 
थोड्याश्या जागेत जनरल बोगीत adjust  कशी होतात
एशियाड किंवा वोल्वो मधून प्रवास करणाऱ्यांना लाल एस टी कशी चालते
न समजणारे एक कोडे आहे.....

घरात असताना स्वताला वेगळी झोपण्याची व्यवस्था पण ट्रेकिंग मध्ये 
दुसर्याच्या उरावर पाय ठेवून झोपण्याची तयारी 
पोटात भूक लागली कि आई आणि बायकोच्या नावाने शंख करणारे आपण
पण रोजच्या पेक्षा उशीर झाला आणि तरीही कच्चे खायला लागले तरी
त्यावर ताव मारणारे टेकर्स हे आपणच कि ...  काहीही समजत नाही.....

रोज स्वतःच्या शहरात फिरताना एका चौकातून दुसऱ्या चौकात 
जायला रिक्षा लागते पण १५ ते २० कि. मी. चे हे ट्रेकर्स असताना कस सहज 
पार करतात तेही पाठीवर ओझे असताना ..... खरच काही समजत नाही......

पण हे जिथे जातात तिथे एक प्रकारचा स्वाभिमान जागृत करतात 
असणाऱ्या परीस्थितीशी जुळवून घेतात आणि निसर्गाची देखभाल करतात ....
आपल्या इतिहासाचे भान आणि शान राखण्याची जबाबदारी आपलीच आहे हे
ओळखून असतात ..... हेच ते खरे ट्रेकर्स ...................................
जे मनात इच्छा धरतात ति तडीस नेतात आणि एका चांगल्या  
उदिष्टासाहीतच ती पूर्ण करतात ....... शेवटी 
ट्रेकर्सच ते एका सळसळत्या उत्साहाचे 
जणू प्रतीकच ते !!!!!!! 

College Life

कॉलेजलाइफ माझे कॅन्टीन मधला चहा 
चहा सोबत वडापाव पैसे कुठले खिशात 
उधारीचे खाते राव

कट्ट्यावर बसण लेक्चर चुकवून 
पोरींची चेष्टा करण 
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच झुरनं

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला 
कुणाच्या तरी वहीतले पान
आणि पेन सुद्धा ढापलेला

परीक्षा जवळ आली कि 
मात्र रात्री जागायच्या 
डोळ्यात स्वप्न उद्याची म्हणून 
झोपाही शहाण्यासारखे वागायच्या

पूर्ण व्हायचे एक वर्तुळ 
एक वर्ष सरायचे पुन्हा 
नव्या पाखरांसोबत
जून झाड भरायचं

अशी वर्तुळे भरता भरता 
कळला कागदच भरला 
वर्तुळ झालेल्या कागदाला 
सलाम करायचा उरला

पुन्हा नवीन रस्ता
नवीन साथीदार त्याच
जुन्या रस्त्याच्या प्रवासाचे !!!

Wednesday 16 March 2011

पायात माझ्या त्राण नव्हते



मायभूमीच्या संरक्षणार्थ हात दोन सरसावले होते
पण घराचा उंबरा ओलांडताना
पायात माझ्या त्राण नव्हते
शत्रूंच्या छातीचा वेध घेणारे
वज्र बंदुकीतून निघत होते
मित्राचं वाहणारे रक्त बघताना
पायात माझ्या त्राण नव्हते
स्वकीयांच्या आरोळ्यांनी कान तेव्हा
थिजले होते थरथरणारे काळीज सांभाळताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जवानांच्या रक्ताचे पाट येथे वाहत होते
प्रतिशोधाची भावना मनी असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जग हे सोडताना अश्रू डोळ्यातून वाहत होते
निघण्याची वेळ आलेली असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
मायभूमीला सोडताना काळीज सुन्न 
झाले होते अखेरचे श्वास घेताना
पायात माझ्या  त्राण नव्हते
शेवटचे वंदन स्वीकार माते कर्तव्य
मी वाटते निभावले आहे 
मातीत मला मिसळताना 
पायात माझ्या  त्राण नव्हते
Add caption


पायात माझ्या त्राण नव्हते!!!


मायभूमीच्या संरक्षणार्थ हात दोन सरसावले होते
पण घराचा उंबरा ओलांडताना
पायात माझ्या त्राण नव्हते
शत्रूंच्या छातीचा वेध घेणारे
वज्र बंदुकीतून निघत होते
मित्राचं वाहणारे रक्त बघताना
पायात माझ्या त्राण नव्हते
स्वकीयांच्या आरोळ्यांनी कान तेव्हा
थिजले होते थरथरणारे काळीज सांभाळताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जवानांच्या रक्ताचे पाट येथे वाहत होते
प्रतिशोधाची भावना मनी असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
जग हे सोडताना अश्रू डोळ्यातून वाहत होते
निघण्याची वेळ आलेली असताना
पायात माझ्या त्राण नव्हते
मायभूमीला सोडताना काळीज सुन्न 
झाले होते अखेरचे श्वास घेताना
पायात माझ्या  त्राण नव्हते
शेवटचे वंदन स्वीकार माते कर्तव्य
मी वाटते निभावले आहे 
मातीत मला मिसळताना 
पायात माझ्या  त्राण नव्हते


Wednesday 2 March 2011

आमच्या बाईंसाठी

अडगळीच्या खोलीमधले दप्तर
आजही जेव्हा दिसत
मन पुन्हा तरुण होऊन
बाकांवरती जाऊन बसत ||
प्राथनेचा शब्द न शब्द माझ्या
कानामध्ये घुमतो
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली वही माझी
अपूर्णच शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरच
बाई आता रोज जगतो
चुकलोच कधी तर तुमच्यासारख
स्वतालाच रागवून बघतो ||
इवल्याश्या रोपट्याची तुम्ही
इतकी वाढ केली आहे
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||
चांगले अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोट संस्कारांचा
समास तेवढा सोडतो
फळ्यावरच्या सुविचारांसारखी
रोज माणसं जोडतो ||
योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली
हळव्या क्षणांची काही पाने
ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही
फक्त एकदा पाहून जा
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||