Wednesday 17 October 2012

बहुतेक असावे हे प्रेम ......

एक दुपार अशीच सरत्या मे महिन्याची
मी खिडकी पाशी वाचत बसलेलो
इतक्यात चाहूल लागली पावसाची
हवेत आलेल्या गारव्याने उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्णमेघांनी चांगलीच जिरवली
सोसाट्याचा वर सुटला आणि
बटांशी तिच्या खेळू लागला
त्या हळुवार स्पर्शात
माझा भास तिला झाला
बघता बघता जलधारा
बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी धरती भिजवू लागल्या
झाड पान रस्त्यासोबत
हवेलाही नाही सोडले
ऊरात दडलेल्या आठवणीना
हलक्या सरींनी जागवले
नकळत हातातले पुस्तक मिटल
मन भूतकाळात रमलं
ओल्या मृदुगंधासोबत
आठवणीच अत्तर दरवळल
पहिल्या पावसाचे हेच तर
अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच खूप जवळच नात असत.....
                                      चिन्मय .................

Thursday 11 October 2012

आठवणी...


काळोखात मिट्ट गुडूप झालेल्या,
आपल्या सावल्या...
जेव्हा आपल्याच अंगावर येऊ पाहतात,
आठवणींच्या वाटेवरुन..
आपल्या तना-मनात शिरतात,
काहीच सुचत नाही..
पण एवढं नक्की,
आठवणींच्या वाटा..
नेहमी काळजातूनच पुढे जातात..
रक्ताचे पाट वाहत राहतात..
हुंदक्यांचे घाटांवर घाट चढत राहतात,
तळवे ओलसर होत राहतात..
झंझावताच्या लाटांच्या लाटा,
खेचत राहतात्..आतपर्यंत्..खोल खोल..
आणि पालापाचोळ्यासारखं भिरकावून देतात..
उष्ण उष्ण श्वास काळजात भरुन राहतात,
पळसाची फुले फुलत राहतात...
धुवांधार पावसात,
कोसळणार्‍या ,कडाडणार्‍या विजा ..
मन पित राहत,
त्या पिण्याला विरोध करण्याच बळ..
ते मात्र त्याच्यात नसतं,
म्हणूनच..
आठवणींच्या देशात जाऊच नये कधी,
तुटलेले धागे सांधूच नये कधी..
जखम भरलेली असते..
पुन्हा ती उघडी करुच नये कधी.. ...