Tuesday 26 July 2011

आयुष्य असचं जगायचं असतं............

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,
तरी कुठेतरी थांबायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं.

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,
स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,
हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं............

Friday 15 July 2011

प्रीत

लाटांच प्रेम होते किनारयावर
पण तिचे लग्न झाले सागराबरोबर
किनारयाची प्रीत तिला खेचत आणते
पण 
प्रेमाला डाग लागु नये म्हणून
ती परत जात रहाते

Wednesday 13 July 2011

"एकटाच"

♡♥♡♥♡ मी कसा आहे हे कधी कधी मलाच कळत नाही... शब्द तर खूप असतात व्यक्त होण्यासाठी... पण हल्ली ते माझ्याकडे वळत नाही... ♡♥♡♥♡

......................................................

मैत्री आणि प्रेमामधे अंतर असते..
रेषा किती जाडिची असावी हा,
ज्याचा त्याचा निर्णय आहे..
आपल्या निर्णयाचे मन आपल्या हातात आहे..........!

......................................................

एक बाकी.. "एकाकी"
एक अंत.. "एकांत"
एक अडके.. "एकात"
एक एकटा.. "जगात"
एक "खिड़की", एक "वारा",
एक "चंद्र", एक "तारा",
एक "नजर," एक "वाट",
.
.
.
.
.
एक एकटा............."एकटाच"