Sunday 24 April 2011

मी लिहितो ....लिहित जातो...

मी लिहितो , का लिहितो?
नाही माहीत तरी लिहितो
की .....................
आहे माहिती म्हणून लिहितो?

करी कधी कुणी प्रशंसा
वा करी कधी कुणी निंदा
व्हावी प्रशंसा वा कधी निंदा
म्हणूनी का मी हें लिहितो?

काही बाही मी लिहुनी जातो
माणूस त्यातुनी मेळवीत जातो
शोधण्यासी त्या माणसांना
बहुधा का मी लिहित जातो?

लिहिता लिहिता मी थकून जातो
शोध माणसांचा अपुराच राहतो
ध्येयाप्रती समर्पित माझ्या मी
असा तसा हें लिहितची जातो

लिहिता मग कधी माणूस गावतो
माझ्यातला तो अव्यक्त व्यक्ततो
व्यक्तलेल्या माणसांत कां त्या
माझ्यातला मी शोधित असतो?

असेल कदाचित,नसेल कदाचित
तरी पण मी लिहिताच असतो
नाही माहित तरीही लिहितो, की
आहे माहित म्हणूनी मी लिहितो .......

Saturday 16 April 2011

प्रेमात गणित नसते...

प्रेमात गणित नसते...

प्रेमात गणित नसते...
पण प्रेमात आणि आयुष्यात एक गोष्ट सत्य असते ...
कुठले गणित बरोबर येइल हे आपण सांगू शकत नहीं...
आणि कुठले चुकेल हे पण सांगू शकत नहीं...


आपल्या हातात फक्त गणित मांडणे असते..

इथे सगळेच व्यवहार उलटे असतात..

जी व्यक्ति आपली समजुन जिव लावतो..ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नहीं..
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते...ती आपल्यावर जिव टाकत असते..

गोष्ट प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याचिच असते अस नहीं..
हा प्रकार सगळ्या नात्यांमधे थोड्याफार फरकाने दिसून येतो..

Monday 11 April 2011

ती फ़क्त आईच !!!

ती फ़क्त आईच!!!
ती आई
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!

बघ तुला जमत का ??????


प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?

माझ्या घड्याळाला १००% टाईमावर अलार्म वाजवायला आठवत 
बघ तुला काही त्यातून घेता आल तर............

प्रत्येक वेळी मीच call करायला  हव का ?
बघ जरा तुला balance  संपवायला जमत का......?

कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,
बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल तर.............

प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?

फुलपाखरा सुद्धा मध असलेलच फुल बरोबर निवडतात,
बघ तुला त्यांच्या सारखा काही करता आल तर............

प्रत्येक वेळी मीच मिठीत घ्यायला हव का ?
बघ तुला लाजून हिरमुसून मिठीत घेता आल तर ........

तो बघ झाड त्याला वेलींनी चारही दिशांनी व्यापून मिठीत घेतलाय,
बघ त्या वेलीन पासून काही निरीक्षण करता आल तर........

प्रत्येक वेळी भेटीच वाचन मीच द्याला हव का ?
बघ कधीतरी तुला करता आल तर.........

पक्षी हि भेटतात एकमेकांच्या ओढीने
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ?

प्रत्येक वेळी मीच कविता करायला हवी का?
बघ तुला तुझ्या भावना बाहेर काढता आल्या तर?

हि कविता तुला आवडलीच असेल 
मग बघ यातून काही प्रेरणा घेता आली तर.........
बघ जरा तुला.............हे जमलाच तर.........

एकदातरी बघ तिला सांगुन......

एकदातरी बघ तिला सांगुन......
बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून




कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला 

एकदातरी बघ तिला सांगुन......

असा तो एखादाच असतो

असा तो एखादाच असतो!


असा तो एखादाच असतो ...
जवळ नसुनही जवळचा वाटतो
न बोलताच खुप काही सांगुन जातो
मनातली सल मनातच ठेवत
मनात कुठेतरी घर करुन जातो !

असा तो एखादाच असतो ...
स्वःताच जग बदलुन जातो
आठवणींच्या पाउलखुणाच मागे ठेवुन जातो
कधी आपणच त्या वाटेकडे बघत बसतो
खुणांचा मागोसा घेत कुठे तरी हरवतो !

असा तो एखादाच असतो ...
चुकल्या वाटेवर परत भेटतो
क्षणभर आपणच मग बावचळतो
डोळे बंद करुन त्याच्याकडे झेपावतो
पण डोळे उघडताच स्वप्नभंग होतो !

असा तो एखादाच असतो ...
स्वप्नातच तो आपल्याला हसवुन जातो
आपणच मग आपल्याला सावरतो
आरशात बघत स्वःतालाच विसरतो
मात्र तो..सुख देवुन दुःख घेवुन जातो !

Tuesday 5 April 2011

व्याख्या

दिसेल ते सुंदर असेलच असे नाही...
त्या दिसण्याला काही व्याख्या हि बनतेच असे नाही...

सुंदर बघण्यामागे सुद्धा एक सुंदर मन असावे लागते 
मनाचा सुंदरपणा हा मात्र त्यातूनच दिसत राहतो .......

या मनालाच स्वताचा ठाव ठिकाणा मात्र माहित नसतो
हे मन मात्र एका ठिकाणाहून दुसर्याच ठिकाणी जात राहते

त्याला कसे अडवावे हे मात्र त्या मनालाच कळतच नाही .....
शेवटी ...... शेवटी प्रत्येक गोष्टीची एक व्याख्या हि 
असतेच असे नाही......